2soniya_20gandh_20and_20modi_20ff
2soniya_20gandh_20and_20modi_20ff 
मुख्य बातम्या मोबाईल

गांधी परिवाराबाबत भाजप आक्रमक... तीन ट्रस्टच्या चैाकशीसाठी समिती 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गांधी परिवार याच्यांशी संबधित तीन ट्रस्टने केलेल्या आर्थिक व्यवहारात नियमांचे पालन न केल्यामुळे या ट्रस्टची चैाकशी करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चैरिटेबल ट्रस्ट, आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांनी इनकम टॅक्स आणि अन्य आर्थिक व्यवहार ह नियम डावलून केल्यामुळे त्यांच्या चैाकशीसाठी गृहमंत्रालयाने एक समिती नेमली आहे.

ही समिती या तीनही ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे चैाकशी करणार आहेत.  केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्यांनी बुधवारी सकाळी टि्वट करून ही माहिती दिली होती. गृह मंत्रालयाने केलेल्या टि्वटनुसार ईडीचे विशेष संचालक या समितीचे प्रमुख असणार आहेत.

गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षाने कॅाग्रेसवर याबाबत निशाला साधला होता. डॅा. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी राजीव गांधी फाउंडेशनला पंतप्रधान सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली होती, असा आरोप भाजपने केला होता. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आरोप केला होता की संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पंतप्रधामंत्री सहायता निधी कोष आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आला आहे. पण यातून राजीव गांधी फाउंडेशनला काही रक्कम दिली होती. यावेळी याची जबाबदारी कोणाची होती...असा आरोप करून त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर टिका केली होती.  

सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशनच्या प्रमुख आहेत. त्यांच्या संचालक मंडळात राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, माजी मंत्री पी. चिंदम्बरम, माजी पंतप्रधानमंत्री डॅा. मनमोहनसिंग यांचा समावेश आहे. 


भारतीय जनता पक्षाने आरोप केला होता की 1991 मध्ये आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन वित्तमंत्री डॅा. मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी फाउंडेशनसाठी 100 कोटी मंजूर केले होते. भारतीय जनता पक्षाच्यावतीने आपल्या एका भाषणात सांगितले होते की डॅा. मनमोहनसिंग यांनी राजीव गांधी फाउंडेशनला 100 कोटी रूपये, तसेच पाच वर्षापर्यंत दरवर्षी 20 कोटी रूपये दिल्याची नोंद 1991 च्या अर्थंसंकल्पीय भाषणाच्या कागदपत्रांमध्ये पृष्ठ 16 वर उल्लेख केला आहे. यावर कॅाग्रेने या आरोपाचे खंडन केले होते. भारत-चीन संघर्षा अपयशी ठरलेलल्या भाजपने देशातील जनतेचे लक्ष हटविण्यासाठी राजीव गांधी फाउंडेशनबाबत या आरोप केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT